संघर्ष अटळ आहे

                       संघर्ष अटळ आहे 
मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष हा अटळ आहे,
तू कोण आहे, कसा आहे, का आहे, कुठून आहे  हे महत्वाचे नाही 
पण संघर्ष आहे 
जगण्याचा संघर्ष हा अटळ आहे कारण तो चिरकाल आहे 
सन्मान, अस्मिता, हक्क, अभिमान, इगो , स्वार्थ  हे प्रत्येकाचे 
पण त्या साठी सुद्धा संघर्ष ?  पण संघर्ष आहे 
मी , आम्ही, तू, तुम्ही, माझा , आमचे, तुझा , तुमचे, आपला, आपले, 
संघर्ष प्रत्येकात प्रत्येकासाठी आहे , तो सर्वंकष आहे,
पण संघर्ष आहे 
जगण्यास दिशा आहे माहित नाही , जगण्यासाठी भान आहे माहित नाही ,
भूक आहे, तहान आहे , ओळख आहे , गरज आहे , मन आहे , मेंदू आहे , 
पण संघर्ष आहे 
होय आज संघर्ष आहे, जमिनीस फाडून जन्मास येणाऱ्या बिजा प्रमाणे 
प्रत्येक निसर्गातील घटक निसर्ग चक्रास अधीन राहून संघर्षास सामोरे आहे,
मानव त्याच्या निर्मीत नियमानुसार संघर्षात आहे,
पण संघर्ष आहे 

सिद्धार्थ खरात
सातारा , पश्चिम महाराष्ट्र  
९८२३३९१९८३
  

Comments

Popular posts from this blog